चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, संस्था चालकांकडून दवाबाचा आरोप

शैक्षणिक संस्थेत पाच वर्षीय चिमुरडीवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2018, 12:49 AM IST
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, संस्था चालकांकडून दवाबाचा आरोप title=

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा इथल्या नूतन माध्यमिक विद्यालय या शैक्षणिक संस्थेत पाच वर्षीय चिमुरडीवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. 

संस्थाचालकांनी कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप

गेल्या ८ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या खळबळजनक घटनेची बाहेर वाच्यता करू नये, यासाठी संस्थाचालकांनी कुटुंबावर दबाव आणल्याचा आरोप, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय. 

कुटुंबीयांची जळगाव जिल्हापेठ पोलिसांकडे तक्रार

दोंडाईचा पोलिसांनी तक्रार दाखल न करून घेतल्यानं जळगावात नातेवाईकांकडे आलेल्या कुटुंबीयांनी जिल्हापेठ पोलिसांकडे तक्रार केलीय. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून जिल्हा सरकारी रुग्णालयात पीडित मुलीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

बाललैंगिक शोषण कायद्याने गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध बाललैंगिक शोषण कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय. झिरो क्रमांकाने पोलिसांनी दोंडाईचा पोलिसांत हा गुन्हा वर्ग केलाय.