ग्राऊंड रिपोर्ट: चार वर्षांनंतर माळीण, काल आणि आज..

चार वर्षानंतर काय आहे माळीण गावची परिस्थिती ? पाहुयात विशेष वृत्तांत...

ग्राऊंड रिपोर्ट: चार वर्षांनंतर माळीण, काल आणि आज..

साईदिप ढोबळे, झी मीडिया, पुणे: माळीण दुर्घटनेला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. सध्या माळीणवासीय नविन ठिकाणी पुनर्वसन केलेल्या गावामध्ये राहत आहेत. चार वर्षानंतर काय आहे माळीण गावची परिस्थिती ? पाहुयात विशेष वृत्तांत...

३० जुलै २०१४.... वेळ सकाळी साडेसहाची.... धो धो पाऊस... ग्रामस्थ झोपेत... आणि याच जोरदार पावसामध्ये डोंगराचा एक भाग माळीण गावावर कोसळला आणि संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तब्बल १५१ नागरीकांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला. माणसं गेली, घरे गेली, जनावरे गेली, फक्त उरली ती लाल ओसाड जमीन. शासनानं दुर्घटना घडल्यावर गावचं पुनर्वसन केलं. गेल्या वर्षी या ठिकाणी शासनाच्या वतिने स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्या ठिकाणी १५१ नागरीकांच्या प्रीत्यर्थ वृक्षारोपण करून प्रत्येक झाडाला एक-एका मृत व्यक्तीचे नाव देण्यात आलंय. चार वर्षानंतर काय आहे माळीण गावची परिस्थिती ? पाहुयात विशेष वृत्तांत...