Pandharpur Bypoll Election | समाधान आवताडे यांना आता मोहिते पाटील समर्थकांचा पाठिंबा?

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मोहिते-पाटील आणि उमेदवार आवताडे यांच

Updated: Mar 31, 2021, 05:34 PM IST
 Pandharpur Bypoll Election | समाधान आवताडे यांना आता मोहिते पाटील समर्थकांचा पाठिंबा? title=

सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर :  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मोहिते-पाटील आणि उमेदवार आवताडे यांच मनोमिलन झाल्याचं दिसतंय. समाधान आवताडे यांच्या विजयासाठी मोहिते-पाटील समर्थकांची बैठक झाली आहे. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची अकलूज येथे शिवरत्न निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.

येथे कुणीच कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो

राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो हे वाक्य नेहमी बोललं जातं, मात्र त्याचा प्रत्यय पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये आलेला आहे.

तेव्हा समाधान आवताडे काही मतांनी पराभूत 

2015 साली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कृषी आणि पणन प्रक्रिया मतदारसंघातून आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना बिनविरोध करण्यास सत्ताधारी नेत्यांना अपयश आले होते. मंगळवेढ्याचे समाधान अवताडे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे रणजिसिंहांना निवडून येणे आवश्यक होते. त्यावेळी त्यांनी समाधान याना अवघ्या काही मतांनी पराभूत केले होते.त्याच समाधान अवताडे यांना पोटनिवडणुकीत विजयी करण्यासाठी आज मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आले.

मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणण्यासाठी

 पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मोहिते पाटील समर्थक प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून आणण्यासाठी मोहिते-पाटील समर्थकांनी कामाला लागावे, अशा सूचना देण्यात आल्या.