संगमनेर : कोरोना काळात राज्याची परिस्थित बिकट होत असताना अद्यापही काही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसतेय. संगमनेर शहरात रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यात कोरोनाचं थैमान सुरू आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, प्रशासन जीव तोडून काम करीत आहेत. प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी यंत्रणा काम करतेय. रुग्णावाहिका या कोरोना संकटात यंत्रणेचा महत्वाचा भाग आहे. परंतु रुग्णवाहिकेचाच वापर गैरकामासाठी केला जात असल्याची घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली आहे.
संगमनेर शहरात नाकाबंदी दरम्यान, रुग्णवाहिकेत रुग्ण नसतानाही एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. मात्र त्यामध्ये पेशंट नसतानाही सायरन का वाजवतो. असी विचारणा पोलीसांनी केली. त्याचे उत्तरं देताना चालकाची भांबेरी उडाली. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी रुग्णवाहिकेची तपासणी केली.
पोलिसांच्या तापसणीत रुग्णवाहिकेत चक्क सात देशी दारूचे सात बॉक्स आढळून आले. संगमनेर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.