सांगली : गर्भपात प्रकरणी डॉ. रुपाली चौगुले पाठोपाठ दुसरा संशयित डॉ. विजयकुमार चौगुलेलाही अटक करण्यात आलीय. चौगुलेला सांगली न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
सांगली महापालिकेने चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द केलाय. या प्रकरणी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. डॉ.रुपाली चौगुले आणि डॉ. विजयकुमार चौगुले यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. तसेच या दोघांची विभागनिहास चौकशी करण्यासाठी ही प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
तर दुसरीकडे सिव्हिल हॉस्पिटलचे वैदकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे हे चौगुले हॉस्पिटलमध्ये ओपीडी चालवत असल्याचं तपासात उघड झालंय. त्यामुळे डॉ. उगाणेवर ही कारवाईची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान तिसरा संशयित डॉ. स्वप्नील जमदाडेचा शोध सुरू आहे.