महापुराच्या तडाख्यातून सावरलेल्या सांगलीत बाप्पांचं आगमन

सांगलीत गणरायाचं आगमन

Updated: Sep 2, 2019, 04:27 PM IST
महापुराच्या तडाख्यातून सावरलेल्या सांगलीत बाप्पांचं आगमन title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : महापुराच्या तडाख्यातून सावरलेल्या सांगलीत घरोघऱी गणपती आला.... पुरातून सावरत घर उभं राहिलं... आणि बाप्पाचं आगतस्वागत मात्र तेवढ्याच उत्साहात झालं. पुराचा सर्वाधिक फटका बसलेलं हे हरिपूर. खरं तर घरं अजून उभी राहायची आहेत. पुराच्या खुणा अजूनही ताज्या आहेत. पण गणराजाच्या सरबराईत तडजोड नाही. त्याच्या चरणी प्रार्थना एकच. लवकर सावर... लवकर उभं कर....

महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा सांगलीत गणेशोत्सव तसा साधा आहे. कृष्णामाई इथल्या घराघरांमध्ये मुक्कामाला होती. सगळी घरं पाण्यात होती. घरात परतल्यावर चिखल गाळ काढला गेला तो या गणरायाच्या स्वागतासाठी... आणि आता कदाचित गणपतीच लढ म्हणायला सांगलीतल्या घरोघरी आला आहे.