Santosh Deshmukh Case: राज्यात बीड प्रकरण सध्या गाजते आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. बीड हत्यांकाडात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं आहे. त्यामुळं मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसंच, चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. बीड प्रकरणावरुन राज्यात वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दोन आदेश दिले आहेत.
बीडचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. बीड सरपंच हत्याप्रकरणाला 20 दिवस उलटूनही तीन आरोपी फरार आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी मोठे आदेश दिले आहेत. बीडमध्ये काल महामोर्चा निघाला सर्वपक्षीय नेतेदेखील उपस्थित होते. सर्वपक्षीय नेते आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रकरणात वाल्मिक कराडला तात्काळ अटक करा, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे दोन आदेश दिले आहेत.
बीड हत्याकांडात फरार असलेल्या तीन आरोपींची संपत्ती तात्काळ जप्त करण्यात यावी. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे तीन आरोपी फरार आहेत. त्यामुळे त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर, ज्यांचे बंदुकीसोबतचे फोटो आहेत आणि जर ते फोटो खरे असतील तर त्यांच्या बंदुकीचे लायसन्स रद्द करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
20 दिवसानंतरही खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड फरार आहे. वाल्मिक कराडविरोधात कारवाईचा फास आवळला जात आहे. वाल्किम कराडची पत्नी आणि बीडचे राष्ट्रवादीचे जिल्हाधक्ष राजेश्वर चव्हाण यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली आहे. वाल्मिक कराड सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचा थेट आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज दमानिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार ठिय्या आंदोलन करणार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वीस दिवस उलटूनही आरोपी फरार असल्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज सकाळी 10 पासून ठिय्या आंदोलन करणार आहेत.