पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु होतं Sex Racket; प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून पोलिसांना बसला धक्का

Sex Racket Busted: पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पोलिसांना सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला ग्राहक बनवून पाठवलं होतं. यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हॉटेलमधील रुमममध्ये छापा टाकून दोघींची सुटका करण्यात आली.   

शिवराज यादव | Updated: May 15, 2023, 01:32 PM IST
पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु होतं Sex Racket; प्रसिद्ध अभिनेत्रीला पाहून पोलिसांना बसला धक्का title=

Sex Racket Busted: पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) रेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी फाईव्ह स्टार हॉटेलवर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली आहे. यामध्ये एक भोजपुरी अभिनेत्री आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या क्राइम ब्रांचला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर मानवी तस्करी विरोधी पथकाने गुरुवारी एका व्यक्तीला बनावट ग्राहक बनवून पाठवलं होतं. हॉटेलमध्ये गेलेल्या ग्राहकाने देहविक्री सुरु असल्याच्या माहितीला दुजोरा दिल्यानंतर पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हॉटेलमधील रुमममध्ये छापा टाकून दोघींची सुटका करण्यात आली. 

प्राथमिक तपासात हाती आलेल्या माहितीनुसार, देहविक्रीमध्ये सहभागी असणाऱ्या एजंट्सनी या महिलांना सेक्स रॅकेटच्या जाळ्यात ओढलं होतं. पोलिसांनी एजंटला बेड्या ठोकल्या आहेत. तसंच कलम 370 (3) आणि 34 अंतर्गत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  

"धाड टाकून ज्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे त्याच्यातील एक भोजपुरी अभिनेत्री असून दुसरी मॉडेल आहे. त्यांना वेगवेगळी आमिषं देण्यात आली होती. त्यांना 15 ते 25 हजार रुपये दिले जात होते. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून भोजपुरी अभिनेत्रींची नेमकी काय भूमिका होती याची माहिती घेत आहेत. 

कोरेगाव पार्कातही कारवाई

कोरेगाव पार्क येथेही पोलिसांच्या क्राइम ब्रांचने कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी काही स्पा आणि मसाज सेंटवरर धाड टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणी आर्थिक फायद्यासाठी तरुणींचं शोषण केलं जात होतं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना कोरेगावमधील काही स्पा, मसाज सेंटर, दवाखाना, थाय स्पा या ठिकाणांचा वापर करत महिलांना जबरदस्ती देहविक्री व्यावसयात ढकललं जात होतं. यानंतर पोलिसांनी खात्री पटवण्यासाठी या ठिकाणी बनावट ग्राहकांना  पाठवलं होतं. 

यानंतर पोलिसांनी धाड टाकत पाच महिलांची सुटका केली आहे. यामध्ये तीन परदेशी आणि दोन भारतीय महिलांचा समावेश आहे. सुटका केलेल्या महिलांना संरक्षण बचाव फाउंडेशनमध्ये नेण्यात आलं आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी एक आरोपी आणि एका फरार गुन्हेगाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी करत आहेत.