close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना शरद पवारांचा सल्ला

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभांचा सपाटा लावला आहे. यात शरद पवार फक्त टीका करताना दिसत नाहीत. 

Updated: Oct 14, 2019, 10:23 PM IST
फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्यांना शरद पवारांचा सल्ला

कोपरगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सभांचा सपाटा लावला आहे. यात शरद पवार फक्त टीका करताना दिसत नाहीत. तर अतिशय गंभीर विषयांवर देखील टीपण्णी करताना दिसतात. शरद पवार यांनी वर्षानुवर्ष शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटूबांविषयी चिंता व्यक्त करत म्हटलं आहे, फक्त शेतीवर अवलंबून भागवणे कठीण आहे.

फक्त शेतीवर भागवणं कठीण आहे, एका शेतकरी कुटूंबात एक तरी जण नोकरीवर असावा, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यासाठी राज्यात उद्योगधंद्याची भरभराट होणे देखील गरजेची आहे. शरद पवार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावात बोलत होते.

विकास कामांमध्ये जमीन जात आहेत, लोकसंख्येनुसार जमीन देखील कमी होत आहे, म्हणून कमी जमीनीवर भागवणे, आता सोप नाही, यामुळे प्रत्येक शेतकरी कुटूंबात एक तरी जण नोकरीला असावा, असं शरद पवार यांनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे.