ग्रामदैवताच्या दर्शनासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास

दर्शनासाठी जीव धोक्यात घालून प्रवास

Updated: Apr 18, 2022, 05:35 PM IST
ग्रामदैवताच्या दर्शनासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास title=

हेमंत चापुडे, पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि दौंड तालुक्यांना वरदान ठरलेल्या भीमा नदी पात्रात वडगाव रासाई आणि नानगाव गावचे ग्रामदैवत रासाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर दोन्ही गावच्या मध्यस्थानी भीमा नदीपात्रात असल्याने या देवीच्या दर्शनासाठी भक्तांना नदीपात्रातून होडीने जीव धोक्यात घालून जावं लागतं आहे.

भीमा नदी बारमाही वाहत असल्याने याठिकाणी देवीच्या मंदिरा पर्यंत पूल बांधण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.