बीडमध्ये 'गोली मार भेजे में'!; सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 28, 2024, 03:09 PM IST
बीडमध्ये 'गोली मार भेजे में'!; सुरेश धस यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप title=
सुरेश धस

Suresh Dhas On Dhananjay Munde: भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बीड जिल्ह्यात गोली मार भेजेमे सुरु आहे. आम्ही हुजरेगिरी करणार नाही असे सुरेश धस म्हणाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी सुरेश धस बोलत होते.

मंत्री खाते, कृषी विभागभाड्याने दिले. चाळीस लाखापैकी वाल्मीकला नऊ लाख दिल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती. 1400 हेक्टर जमीन ढापली वाल्मीक कराड आणि बगलबच्चे यांनी हाणली. बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा हडपली. पारधी समाजाची घरे तोडली. ओबीसी म्हणवत आंबेडकर यांचे नाव घेत लुटले.वाल्मीक तात्याला अध्यक्ष केल्याशिवाय सामाजिक सेवा करणाऱ्या दवाखाण्याला परवानगी नव्हती. अनेकांचे खून पचविले खून करणारा त्यांच्या घरी पाणी भरतो आणि ज्याचे केले तोपण पाणी भरतो. ॲडॉल्फ हिटलर बीड मध्ये तयार झाला की काय? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

जाती आपण कधी सोडणार आहोत? संतोष देशमुख जातीसाठी मेला नाही. बीड हा पुरोगामी जिल्हा ओळखला जातो. वाल्मीक नाही तो वाल्या आहे त्रेता युगात वाल्याचा वाल्मीक  झाला आणि कल्युगात वाल्मीकचां वाल्या झाला. लोक म्हणतात वंजाऱ्याच्या विरोधात बोलतायत माणुसकी आहे का त्याला? आंधळे राख ठड यांचा खून झाला. तेपण वंजारी होते.अशोक सोनवणेची अट्रोसिटि दाखल झाली असती तर देशमुखांचा खून झाला नसता. या सर्वाला पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

संतोष मेल्यावर तुम्ही जिवंत झाला.बीड हा बंडखोरांचा जिल्हा आहे. राजकीय बंडखोरी करणारा आहे. बीडने गोपीनाथ मुंडे नाना पाटील अनेक जण दिले. एकी अशीच ठेवा. बीडमध्ये ठिणगी पडली आहे. याचे जनआंदोलन होईल. अटक झाली नाही तर महारष्ट्रमध्ये आग पेटेल, असे आव्हाड यावेळी म्हणाले.  हा वैचारीक लढा आहे. कुठेही हिंसक न होता आपण विचारांनी लढूया, असे आवाहन यावेळी आव्हाड यांनी केले.