कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेची नरमाईची भूमिका

Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे.  

Updated: Mar 18, 2022, 09:45 PM IST
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत शिवसेनेची नरमाईची भूमिका title=

कोल्हापूर : Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली आहे. हा मतदारसंघा महाविकास आघाडी सरकारकडे असल्याने शिवसेनेने नरमाईची धोरण स्विकारले आहे. या जागेवर शिवसेनेने आधी दावा केला होता. मात्र, आघाडी सरकार असल्याने आता येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढविणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होणार आहे.

दरम्यान, एकीकडे काँग्रेसचे नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत असल्याच सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. शिवशक्तीकडून करूणा शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने यापूर्वीच सत्यजित कदम यांचे नाव घोषित केले आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक बहुरंगी होणार असंच सध्याचे चित्र असले तरी काँग्रेस आणि भाजपमध्ये खरी लढत रंगणार आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर महाविकास आघाडी सरकारकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न होते. पण भाजपने या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता ही दुहेरी लढत राहणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीत शिवसेनादेखील आपला उमेदवार उभे करणार अशी चर्चा होती. तसेच शिवसेनाही आग्रही होती. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसेना तयारी लागल्याचे दिसून आले होते. यासाठी आग्रही भूमिकाही मांडली होती. शिवसेनेची समजूत काढण्यात काँग्रेसला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.