शिवनेरी : सरकारच्या व्हिआयपी कल्चर विराधातील शिवप्रेमींचा संताप सोमवारी शिवनेरी गडावर पहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव कार्यक्रम साजरा झाला. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विनोद तावडेही उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमानंतरच्या गडावरील सभेस आणि पायथ्याला होणार्या महोत्सवात हजेरी न लावताच मुख्यमंत्री यावर्षी निघून गेले. त्यानंतर मागे राहिलेल्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे गडावरून उतरताना त्यांना शिवप्रेमिंच्या संतापाचा सामना करावा लागला.
संतप्त शिवप्रेमिंनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच,व्हीआयपी संस्कृती बंद करण्याची मागणी केली.