'माझ्यामुळे लोकांचे मुड ऑफ झाले, मी स्वतः दुनियेतून ऑफ होतोय', म्हणत तरूणाची व्हॉट्सऍप स्टेटस ठेवून आत्महत्या

लोकांच्या मनावर अधिराज्य केले तर काहींच्या डोक्यात... आत्महत्या करताना नेमकं काय होतं डोक्यात?

Updated: Jun 4, 2021, 09:20 AM IST
 'माझ्यामुळे लोकांचे मुड ऑफ झाले, मी स्वतः दुनियेतून ऑफ होतोय', म्हणत तरूणाची व्हॉट्सऍप स्टेटस ठेवून आत्महत्या

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : अयोध्या नगरजवळ असणार्‍या सदगुरू नगरातील तरूणाने मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या प्रकार घडला आहे.हर्षल प्रेमनाथ महाजन अस या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. (Jalgaon Man Suicide) माझ्यामुळे लोकांचे मुड ऑफ झाले, मी स्वतः दुनियेतून ऑफ होतोय, मी माझा छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला, लोकांच्या मनावर अधिराज्य केले, माझ्या मृत्यूला कुणालाही मी जिम्मेदार नाही समजत. ( Shocking! 29 Years old man suicide after his wife leaves Home ) या आशयाच व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवून अयोध्यानगरातील सदगुरु नगर येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याबाबत माहिती अशी की, हर्षल प्रेमनाथ महाजन (वय २९, राहणार सद्गुरु नगर, अयोध्या नगर जवळ, जळगाव) हा तरुण आई-वडील पत्नी आणि भावासह राहतो. तो खासगी कंपनीत कामाला असून एकत्रित कुटुंबात राहतात. हर्षल महाजन हा काल आई वडिलांसह रात्री १० वाजता जेवण करून झोपला. मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असताना हर्षलने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास वडील प्रेमनाथ एकनाथ महाजन यांना आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. मुलाचा मृतदेह पाहून घरातील कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल याने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर पहाटे 2 वाजून 22 मिनिटांनी व्हॉटस्ऍपवर स्टेटस ठेवले. माझ्यामुळे लोकांचे मुड ऑफ झाले पण मी स्वतः दुनियेतून ऑफ होत आहे. मी माझ्या छोट्याशा जीवनाचा प्रवास खूप छान केला. लोकांच्या मनावर अधिराज्य केले आणि काहींच्या डोक्यात, आणि मित्र परिवार छान लाभले, माझी आई वडील हे दुनियेतील खूप छान देव माणूस आहे. पुढचा जन्म हा त्यांच्या पोटीच जन्माला येवो, ही प्रार्थना देवाला करतो, आणि मी कोणाला या गोष्टीचा जबाबदार नाही समजत, आणि कोणाला काही चुकीचे बोलले गेले असेल तर माफी मागतो, अशा आशयाच स्टेटस ठेवून हर्षल याने गळफास घेवून जगाचा निरोप घेतला. त्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी मोबाईल तपासला असता ही बाब समोर आली आहे.