IPS Meera Borwankar Book : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरणवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या पुस्तकात केलेल्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकारणात (Maharahstra Politics) आता खळबळ उडण्याची शक्यता आहे. आयपीएस (IPS) अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर (Madam Commissioner) पुस्तकात केलेल्या धक्कादायक दाव्याने राजकीय वर्तुळात आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या पुस्तकात मीरा बोरवणकरांनी त्यावेळच्या पालकमंत्र्यांचा दादा असा उल्लेख करत घेत धक्कादायक असा दावा केला आहे. पोलिसांची म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या. त्यावर मी नाही म्हणाले, असा गौप्यस्फोट मीरा बोरवणकर यांनी केला आहे. मात्र या पुस्तकामधील दादा म्हणजे कोण याबाबतचं स्पष्टीकरण बोरवणकर यांनी दिलेलं नाही.
मीरा बोरवणकर यांच्या या गौप्यस्फोटामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. पु्ण्यातील पालकमंत्र्यांनी पोलिसांच्या जागेचा लिलाव केला. जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भात मला त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. मात्र मी नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलवर भिरकारला,' असं मीरा बोरवणकरांनी पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळे आता विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
‘मॅडम कमिशनर’ पुस्तकात काय म्हटलंय?
"पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटलं. त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होता. त्यांनी मला सांगितलं की, या जागेचा लिलाव झालेला आहे. जास्त बोली लावणाऱ्यासोबत मी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही. शिवाय कार्यालयं आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज असल्याचं मी त्यांना सांगितलं. मी आताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. पण, त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला," असं बोरवणकरांनी पुस्तकात म्हटलं आहे.
संजय राऊतांची खोचक टीका
या प्रकरणी आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. "आता ईडी, देवेंद्र फडणवी, आर्थिक गुन्हे शाखा काय करणार आहे? हा प्रश्न तुम्ही माझ्याऐवजी सरकारला भाजपा नेत्यांना विचारायला हवं. ज्या व्यक्तींना तुम्ही सोबत बसवलं आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे असो की त्यांच्यासोबतच 40 अलिबाबा आणि चाळीस चोर असोत किंवा अजित पवार आणि त्यांचे 40 चोर असोत. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी दावा करत आहे की, सरकारी जमीन त्यांना लाटायची होती. भ्रष्टाचाराच्या बाबतीत एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे चारित्र्य कसं आहे हे सगळ्यांना माहिती आहे," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.