धक्कादायक! मोबाईल खेळण्यासाठी रागवले म्हणून मुलांकडून वडिलांवर चाकूहल्ला

जन्मदात्या बापाची मायाही इथे फिकी पडली, मुलाने उचललं टोकाचं पाऊल 

Updated: Jul 2, 2021, 01:27 PM IST
धक्कादायक! मोबाईल खेळण्यासाठी रागवले म्हणून मुलांकडून वडिलांवर चाकूहल्ला   title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मोबाईलवर खेळण्यासाठी रागवल्यामुळे मुलाने वडिलांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. शुभम उर्फ गोलू निरगुडे( वय -25 वर्ष) असं आरोपी मुलाचे नाव आहे. दीपक भाऊराव निरगुडे असं दुर्दैवी वडिलांचे ( वय 52 वर्ष) नाव आहे. 

तरुण पीढी मोबईलच्या आहारी गेली आहे. त्याचे दुष्परिणाम सासत्यानं दिसून येत आहे. 25 वर्षांचा मुलगा कामाला जाण्याऐवजी घरात बसून मोबईलवर गेम वा मोबाईलवर चित्रपट पाहात असेल तर आईवडिलांना मुलाच्या भविष्याच्या दृष्टीनं चिंता वाटणे स्वाभाविकच आहे. त्याच्यावरून आईवडिल रागवत असतील तरी ते मुलाच्या हितासाठीच असतं.

मात्र वडिलांनी याकरता रागावलं म्हणून नागपुरात तरुण मुलानं वडिलांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. नागपुरातील इंदिरानगर जाटतरोडी क्रमांक 1मध्ये निरगुडे कुटुंब रहात. 55 वर्षीय दीपक निरगुडे रिक्षा चालवत तर त्यांच्या मुलगा 25 वर्षीय तरुण मुलगा शुभम बेरोजगार होता. शुभम घरी सतत मोबईलवर गेम खेळायचा, चित्रपट पहात राहायचा.

वडिल दीपक मुलगा शुभमला सतत कामधंदा पहा मोबईलवर घरी का खेळत रहातो असं रागावयचे. यावरून त्यांच्यात खटके उडायचे. 25 जुनला रात्री दीपक निरगुडे रिक्षा चालवून घरी परतलेत्यावेळी मुलगा त्यांना मोबईलवर खेळताना दिसला. त्यामुळं त्यांनी मुलालं मोबईल खेळत असल्याबद्दल रागवत कामधंदा शोधायला सांगितला. मात्र वडिलांनी रागवलं म्हणून शुभम संतापला.

वडिल मोबईल खेळण्यासाठी रागवत आहे या कारणावरून त्यानं टोकाचं पाऊल उचललं आणि  घऱातील चाकू घेत वडिलांच्या पोटावर वार करत जीवघेणा हल्ला केला..यात वडिल गंभीर जखमी झाले..त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करण्यात आलं...मात्र ज्या मुलाकरता आय़ुष्यभर घाम गाळला.

तळ हातावरील फोडासारख जपलं त्याच पोटच्या पोरानं रागवल म्हणून जीवघेणा हल्ला केल्याच्या हा घटनेनं अनेक सवाल उपस्थित केल आहे. याप्रकरणी इमामवाडा पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई केली असली तरी पोटच्या पोरानं मोबईलकरता आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला हा आघात वडिलांसाठी फार मोठा आहे.