Allu Arjun Arrest : 'पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनला (Allu Arjun) शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली. अल्लू अर्जूनला सकाळी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या तसेच त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र अखेर त्याला अंतरिम जामीन मिळाला आणि त्याची जेलवारी टळली. अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने (Varun Dhawan) त्याची पाठराखण केली आहे.
बेबी जॉन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरून धवन जयपूर येथे पोहोचला होता. बेबी जॉन या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलेल्या वरुणने अल्लू अर्जुनला करण्यात आलेल्या अटकेवर भाष्य केलं. त्याने अल्लू अर्जुनची पाठराखण करून सुरक्षा व्यवस्थेवर आपलं मत व्यक्त केलं. त्याने म्हटले प्रत्येक गोष्टीसाठी कलाकार कसा काय जबाबदार असू शकतो.
हेही वाचा : अल्लू अर्जुनच नाही तर 'या' बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा खाल्लीये जेलची हवा
वरूण धवन म्हणाला की, 'सुरक्षेचे अनेक प्रोटोकॉल असतात. एक अभिनेताच प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा असू शकतो'. वरुणने चित्रपट गृहात मृत्यू झालेल्या महिलेच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि दुखापतग्रस्त मुलगा लवकर बरा व्हावा यासाठी देखील प्रार्थना केली.
4 डिसेंबर रोजी पुष्पा 2 च्या स्क्रीनिंग दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली, यात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन याच्या विरोधात एफआयआर दाखल केली. अभिनेत्याच्या ऐवजी चित्रपट गृहातील सुरक्षा रक्षक टीम आणि चित्रपटगृहाच्या मालकावर देखील कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत चिक्कड़पल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
हेही वाचा : अल्लू अर्जुन अटक प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; 'ते' पत्र आलं समोर, पीडित महिलेचा नवरा म्हणतो, 'त्यानेच...'
अल्लू अर्जुनने त्याला करण्यात आलेल्या अटकेच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी आपल्याला अन्यायकारकपणे अटक केल्याचा आरोप त्याने केला. अल्लू अर्जुन म्हणाला मला पोलिसांनी ना कपडे बदलण्याची संधी दिली ना नाश्ता करण्याची. इतकंच नाही तर पोलीस बेडरूममध्ये घुसल्याचा दावा अभिनेत्याने केला आहे.