धक्कादायक! वर्ध्यात भर न्यायालयात महिला वकिलावर चाकू हल्ला

एका प्रकरणात साक्ष सुरु असताना आरोपी थेट चाकू घेऊन न्यायालयात शिरला

Updated: Mar 22, 2022, 03:23 PM IST
धक्कादायक! वर्ध्यात भर न्यायालयात महिला वकिलावर चाकू हल्ला title=

वर्धा : वर्ध्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यात न्यायाधीश यांच्या दालनात हमिला वकीलावर चाकू हल्ला करण्यात आला.

वर्ध्याच्या जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयातील ही घटना घडली आहे. हल्ल्यात महिला वकील गंभीर जखमी झाल्या असून त्यांना वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आज दुपारी २ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. एका प्रकरणात साक्ष सुरु असताना आरोपीने अचानक न्यायालयात येत महिला वकीलावर चाकू हल्ला केला.

योगिता मुन असं हल्ल्यात जखमी झालेल्या महिला वकीलाचं नाव आहे. तर भीम गोविंद पाटील असं आरोपीचं नावं आहे, आरोपीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

न्यायालयात आरोपीने चाकू आणला कसा हा प्रश्न आता विचारला जात आहे.