सना खान प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचा खुलासा

सना खान प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 

Updated: Aug 20, 2023, 08:10 PM IST
सना खान प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट! संशयीत आरोपी सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याचा खुलासा title=

Sana Khan Update : सना खान प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे (Sana Khan Murder Case). सना खानची हत्या केल्याचा आरोप असलेला आरोपी अमित साहू सेक्स रॅकेट चालवून सेक्सटॉर्शन करत असल्याची बाब तपासात पुढं आली आहे. पीडित महिलेला लोकांकडे पाठवून तो त्यांच्या अश्लील व्हिडिओ क्लिप बनवायचा, त्यानंतर संबंधितांकडून खंडणी उकळायचा. पीडित महिलेच्या आईच्या तक्रारीनंतर मानकापूर पोलिसांनी अमित साहू आणि त्याच्या जबलपूरमधल्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. यात आणखी किती आरोपी आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

तो मृतदेह सना खानचा नाही

भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या सना खान यांच्या हत्येचं गूढ वाढले. मध्य प्रदेशातील हरदामधील शिराली तालुक्यात एका विहिरीत महिलेचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह सना खानचा असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, सापडलेला मृतदेह सना खानचा नसल्याचं तिच्या कुटुंबीयांनी म्हटल. त्यामुळे पोलीस आता या मृतदेहाची DNA टेस्ट करणार आहेत .या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सना खान यांच्यासह नेमकं घडलं काय?

नागपुरातील बेपत्ता सना खान प्रकरणी अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी अमित शाहू आणि त्यांचा नोकर जितेंद्र गौडाला पोलिसांनी अटक केली आहे. भाजप कार्यकर्त्या सना खान  दिवसांपासून बेपत्ता आहेत. अमित साहूला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. त्यानंतर 2 ऑगस्टला त्यांच्यात भांडण झालं. तेव्हापासून त्या गायब आहेत. सना खान यांच्या कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. 

अमितनं दिली सना खानची हत्या केल्याची कबुली 

भाजप कार्यकर्त्या सना खान हत्या प्रकरणातील आरोपी अमित साहूला पोलिसांनी नागपुरात आणलंय. पोलिसांनी काल अमित साहू आणि त्याला मदत करणाऱ्या राजेश सिंहला मध्य प्रदेशातील जबलपूरमधून अटक केली. अमितनं सना खानची हत्या केल्याची कबुली दिली. त्या दोघांनी लग्नही केल्याचं तपासातून समोर आलंय. 2 ऑगस्टला सना आणि अमितमध्ये वाद झाला. यातून अमितनं सना खानच्या डोक्यावर रॉड घालून तिचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह जबलपूरच्या हिरन नदीत फेकून दिला. अमित साहूची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर अगोदरही खुनाचा गुन्हा दाखल आहे.