chhagan bhujbal : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. वादग्रस्त विधानानंतर छगन भुजबळ यांना कानाखाली मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळांच्या कानाखाली मारणा-याला 1 लाखांचं बक्षीस देणार अशी घोषणा करण्यात आलेय. यानंतर भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेय.
जो कुणी भुजबळांच्या कानाखाली मारेल त्याला एक लाख रूपयांची बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे विश्वजीत देशपांडेंनी केलीय. तर आपण अशा धमक्याना घाबरत नाही असं छगन भुजबळांनी म्हंटलंय. धमकीनंतर भुजबळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी ही नावं का असत नाहीत असं विधान छगन भुजबळांनी केलं होतं.
छगन भुजबळांच्या ब्राह्मण समाजासंदर्भातल्या विधानानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येता आहेच. मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत:चं नाव बदलावं असं आव्हान ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंनी दिले. छगन भुजबळ यांनी इतरांबद्दल बोलण्याआधी त्यांच्या स्वतःच्या घरातली नावं बदलावी असंही दवे म्हणालेत.
ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी ही नावं ठेवली जात नाहीत, तर संभाजी भिडेंचं नाव संभाजी कसं याचं स्पष्टीकरण द्या असं आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. मात्र भुजबळांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यावर आज अखेर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ब्राह्मण समाजाचा कोणताही अपमान करण्याचा हेतू नाही, केवळ मनोहर कुलकर्णीचं संभाजी भिडे कसं झालं याचं स्पष्टीकरण द्या असं भुजबळ म्हणाले. तर अशी वक्तव्य म्हणजे समाजा समाजात विद्रोह निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं विनायक राऊतांनी म्हंटलंय.
ज्यांना कधी बघितलंच नाही त्या सरस्वतीची आपण पूजा करतो. पण त्याच सरस्वतीने 5 हजार वर्षं आम्हाला का शिकू दिलं नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं शिक्षणाची देवता या सावित्रीबाई फुलेच आहेत, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलं होते. नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या सरकारला 33 कोटी देव आणि त्यांचं आरक्षण बघायचं आहे असं सांगत, भुजबळांनी भाजपा सरकारवर टीका केली होती. याच भाजपसह भुजबळ आता सत्तेत सहभागी झाले आहेत.