सातारा येथील अपघातात पाच ठार तर गोंदियातील अपघात एक ठार

साताऱ्यात ( Satara Accident) पुणे बंगळुरू महामार्गावर मिनी बस (Bus Accident) नदीत कोसळून मोठा अपघात झाला.  

Updated: Nov 14, 2020, 09:22 AM IST
सातारा येथील अपघातात पाच ठार तर गोंदियातील अपघात एक ठार title=

उंब्रज, सातारा : साताऱ्यात ( Satara Accident) पुणे बंगळुरू महामार्गावर मिनी बस (Bus Accident) नदीत कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर दुसऱ्या एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. गोंदियात (Gondia Accident) पोलिसांच्या गाडीला हा अपघात झाला.

पुणे-बंगळुरु महामार्गावर साताऱ्यात मिनी बस नदीत कोसळली. हा अपघात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर सात जण जखमी झालेत. मृतांमध्ये एक महिला आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. मिनी बसमधील कुटुंब दिवाळीनिमित्ताने गोव्याला फिरायला जात असताना हा अपघात झाला. उंब्रज जवळच्या तारळी नदीत ही बस कोसळली. ही अपघातग्रस्त बस नदी पात्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 गोंदियात दिवाळीला गालबोट लागले आहे. गोंदिया पोलिस दलाच्या वतीने दिवाळीचे औचित्त साधून आधीवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून येणाऱ्या पोलीस दलाच्या गाडीचा अपघात झाला. पाथराटोला गावाजवळ पोलिसांची खासगी वाहन अनियंत्रीत होऊन अपघात झाला. या अपघातात एका पोलिस शिपायाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर ४ पोलीस शिपाई जखमी झाले. जखमींवर गोंदिया शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.