घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

अतिशय धक्कादायक प्रकार 

Updated: Jul 13, 2021, 11:35 AM IST
घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू  title=

चंद्रपूर : शहरालगत दुर्गापूर भागात धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खूप खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांचा या धुरात गुदमरून जीव गेला आहे.  (Six members of the same family died due to suffocation smoke from a generator set installed in the house) 

दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. ३ मधील घटना, मयत सर्व मजूर वर्गातील सदस्य, रात्री वीज गेल्यावर घरात डिझेल जनरेटर संच लावण्यात आला. सकाळी घटना उघडकीस आली. सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात आणले आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. 

मृतकांची नावे 

रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20 लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे 8, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14, या सर्वांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर दासू लष्करे 40 हा एकमेव सदस्य बचावला आहे. यांना रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल  झाले असून तपास सुरू आहे.