कोर्टाच्या दालनातच न्यायाधीशांना साप चावला

धामण जातीचा हा साप असल्याचं समजतंय

Updated: Sep 4, 2018, 04:44 PM IST
कोर्टाच्या दालनातच न्यायाधीशांना साप चावला
सौ. प्रातिनिधिक फोटो

पनवेल : पनवेल न्यायालयाच्या परिसरात आज एक धक्कादायक प्रकार घडलाय. सुनावणीसाठी न्यायालयात दाखल झालेल्या न्यायाधीशांना न्यायालयाच्या दालनातच साप चावलाय. ही घटना आज सकाळी 11.00 वाजल्याच्या सुमारास घडलीय. 

पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश सी. पी. काशीद आज सकाळी नेहमीप्रमाणे कोर्टात दाखल झाले होते. कोर्टात आल्यानंतर दालनात बसल्यानंतर अवघ्या काही वेळातच काशीद साहेबाच्या हाताला साप चावला आणि न्यायालयाच्या आवारात गोंधळ सुरू झाला.


सर्पमित्र आणि वकील दीपक ठाकूर

या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आणि वकील दीपक ठाकूर यांना तातडीनं बोलावण्यात आलं... दीपक ठाकूर यांनी स्वत: हा साप पकडला. धामण जातीचा हा साप असल्याचं समजतंय. 

चौकशीअंती हा साप बिनविषारी असल्याचं समजलं... आणि त्यानंतर न्यायाधिशांच्या आणि इतर वकिलांच्या जीवात जीव आला.