पतसंस्थेमुळे सोलापुरातल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ

कष्टाची कमाई बदमाशांनी हडप केल्यानं एका कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय.

Updated: Aug 17, 2017, 11:13 PM IST
पतसंस्थेमुळे सोलापुरातल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ  title=

सोलापूर : कष्टाची कमाई बदमाशांनी हडप केल्यानं एका कुटुंबावर उपासमारीची वेळ आलीय. सोलापूर जिल्ह्यातील उत्तरेश्वर जाधव यांनी गावातील ४ पतसंस्थांमध्ये सुमारे १५ लाख रुपये गुंतवले होते. मात्र आज त्या पतसंस्थांनी आपला गाशा गुंडाळलाय. त्यामुळे जाधव आणि त्यांच्यासारख्या हजारो गुंतवणूक दारांचे पैसे थकले आहेत.

जाधव यांना त्यांच्या मुलीच्या पायाचं ऑपरेशन करायचंय. मात्र त्यालादेखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत त्यांनी पुण्यातील विधानभवनासमोर उपोषण सुरु केलयं. आपले पैसे परत मिळावेत तसेच संबंधितांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी ते कुटुंबियांसह उपोषणाला बसले आहेत.