रत्नागिरी : तालुक्यातील भावेआडम गावातील गरिब कुटुंब फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
अशिक्षितपणा आणि गरिबीचा फायदा घेत भोंदूबाबाने एका कुटुंबाची फसवणुक केली होती. मृत्यूचे भय दाखवून शुद्धीकरणाच्या नावावर मुस्ताक काजी या भोंदूबाबाने लाखोंचे दागिने लंपास केले होते.
तब्बल १३ विविध प्रकारचे दागिने तुमच्या मरणाचा फास ठरणार आहेत, असं सांगत त्या दागिन्यांची शुद्धतेच्या नावाखाली ते लाटले गेलेत वर्षभर दागिने भोंदूबाबानी दिले नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर भोंदूबाबा विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय होती.
मात्र तक्रार दाखल झाल्यावर हा भोंदू बाबा फरार झाला होता. अखेर ग्रामीण पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यातंर्गत या बाबावर कारवाई करत त्याला अटक केली.