सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर भाजपमध्ये प्रवेश करणार?

सदाभाऊ खोत यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे. 

Updated: May 29, 2017, 11:17 AM IST
सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर भाजपमध्ये प्रवेश करणार?

सातारा :  सदाभाऊ खोत यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.  एकिकडे राजू शेट्टींची आत्मक्लेष यात्रा मुंबईत दाखल होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पचिम महाराष्ट्रात दोन शेतकरी मेळावे होतायत. 

पश्चिम महाराष्ट्रातला पहिला मेळावा हा सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपुरमध्य होतोय.  या मेळाव्याला  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांची प्रमुख  उपस्थिती असणार आहे. याच मेळाव्यात सदाभाऊंचे निकटवर्तीय भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  

राज्यमंत्री सदाभाउ खोत यांचे  खासदार राजु शेट्टी यांच्याबरोबरचे  मतभेत  मिटले नसल्यामुळे  सदाभाउ खोत यांनी आपल्या कार्यकर्त्याच ऱाजकीय पुनर्वसन करन्याच ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदाभाऊ खोत यांचे कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आसल्याची माहिती मिळतीय. खासदार राजु शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यामधील मतभेत प्रचंड ताणले गेलेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x