बर्थडे पार्टीत स्पार्कल कॅंडलचा स्फोट, चिमुकल्याची अवस्था पाहून कुटूंब हादरलं

तीन डॉक्टर...पाच तास शस्त्रक्रिया...दीडशे टाके ! सावधान! तुम्हीही बर्थडे पार्टीत स्पार्कल कॅंडल वापरताय, तर ही बातमी एकदा वाचाच  

Updated: Aug 1, 2022, 09:28 AM IST
बर्थडे पार्टीत स्पार्कल कॅंडलचा स्फोट, चिमुकल्याची अवस्था पाहून कुटूंब हादरलं title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एका बर्थडे पार्टीदरम्यान स्फोट झाल्याची घटना घडली. हा स्फोट इतका भयंकर होता की 10 वर्षाचा मुलगा खुपच गंभीर जखमी झालाय. या चिमुकल्याची अवस्था पाहून कुटूंबाला मोठा धक्का बसलाय. तब्बल तीन डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर हा मुलगा आता मोठ्या अपघातातून वाचला आहे. 

चिमूर तालुक्यातील भिसी गावात राहणारे एक कुटूंब एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमात बर्थडे पार्टीदरम्यान स्पार्कल मेणबत्तीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात 
आरंभचा उजवा गाल आणि जीभ फाटल्याची घटना घडली.  

बर्थडे पार्टीत आनंददायी वातावरण होते. पार्टीत अनेक लोक जेवणाचा आस्वाद घेत होते तर मुले खेळत होती. 10 वर्षांचा मुलगा हा देखील पार्टी दरम्यान खेळत होता, जेव्हा त्याला एक चमकणारी स्पार्कल मेणबत्तीचा दिसली, तेव्हा त्याने ती हातात घेतली आणि तिच्याशी तो खेळू लागला. त्यानंतर अचानक स्पार्कल मेणबत्तीचा मोठा स्फोट झाला आणि त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याचा गाल आणि जीभ फाटली. 

या रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला 50 किलोमीटर दूरवरच्या ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आस्था रुग्णालयात हलविण्यात आले होते. या घटनेत रक्तस्त्राव अधिक झाला असल्याने व वय कमी असल्याने प्लास्टिक सर्जन असलेले डॉ. श्रीकांत पेरका, डॉ. सुमित जयस्वाल आणि डॉ. पंकज लडके यांच्या अथक परिश्रमाने मुलावर 5 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये मुलाला 150 टाके लावल्यानंतर गाल-जीभ जुळवण्यात आली.

प्रत्येक बर्थड़े पार्टीत स्पार्कल मेणबत्ती सर्रास वापरली जाते. मात्र, ती किती घातक आहे हे या घटनेवरून समोर आले आहे. त्यामुळे तुम्ही जर अशाप्रकारची मेणबत्ती आणून वाढदिवस साजरा करत असाल तर आताच सावधान व्हा. नाहीतर अशा घटनांना तुम्हीही बळी पडू शकता.