मुंबई : सामान्य जनतेप्रमाणे पोलिसांनाही (Maharashtra Police) सणांचा आनंद लुटता यावा यासाठी एकनाथ शिंदे (cm eknath shinde)- देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा- दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने पोलिसांना (Police) गिफ्ट दिलंय. पोलिसांच्या सुट्ट्या वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (state government increased holidays of police constables and police inspectors)
आता महाराष्ट्र पोलिसांना एकूण 20 सुट्ट्या मिळणार आहे. याआधी वर्षभरात पोलिसांना केवळ 12 सुट्ट्या मिळत होत्या. राज्य सरकारने पोलिसांना आणखी आठ सुट्ट्या वाढवून दिल्या आहेत.
दरम्यान, नुकताच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांसाठी आणखी एक निर्णय जाहीर करण्यात आला होता. यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी (Police uniform) घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओवरुन बरीच चर्चा देखील सुरु होती. त्यानंतर अखेर पोलीस महासंचालकांकडून याची गंभीर दखल घेण्यात आलीय.
राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातून या संदर्भातील सूचना पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना जारी करण्यात आल्यात. वर्दीत कुणीही नाचू नये, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्यात.