विद्यार्थींच नाही तर संपूर्ण गावाला अश्रू अनावर... अशा शिक्षकांची बदली झाल्यावर कुणाला दु:ख होणार नाही?

डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावर या शिक्षकांनी मोठा बदल घडवला. पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. 

वनिता कांबळे | Updated: Jun 13, 2023, 06:32 PM IST
विद्यार्थींच नाही तर संपूर्ण गावाला अश्रू  अनावर... अशा शिक्षकांची बदली झाल्यावर कुणाला दु:ख होणार नाही? title=

वैभव बाळकुंडे, झी मीडिया, लातुर : नवी पीढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र, ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षण क्षेत्राला भ्रष्ट्राचाराची किड लागली आहे. शिक्षणाचा बाजार मांडला आहे. अशा परिस्थितीत लातुरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन शिक्षक याला अपवाद ठरले आहे.  शिक्षणाचे महत्व पटवून देत संपूर्ण गावाचा कायापालट करणाऱ्या या शिक्षकांची बदली (transfer of teachers ) झाली. या शिक्षकांना निरोप देताना  विद्यार्थींच नाही तर संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले. 

सध्या शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. पण, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात एक दुर्मिळ घटना घडली आहे. शिक्षकांना निरोप देताना संपूर्ण गावाला अश्रू अनावर झाले आहे. जळकोट तालुक्यातील भवानी नगर तांड्यावरील दोन शिक्षकांची प्रशासकीय बदली झाली आहे. या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यासोबत संपूर्ण गावाला दुःख अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. पुष्पवृष्टी करीत विद्यार्थी व पालकांनी या दोन्ही शिक्षकांना निरोप दिला.

नरसिंग सुरेकर आणि बालाजी वाड अशी या शिक्षकांची नाव आहेत. 17 जून 2010 रोजी हे शिक्षण येथील शाळेत रूजू झाले होते.  तब्बल 13 वर्ष या शिक्षकांनी येथे सेवा बजावली. या 13 वर्षात या  दोन शिक्षकांनी तांड्याचा कायापालट केला. डोंगराळ भागात असलेल्या या तांड्यावरील पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.  या दोन्ही शिक्षकांनी शाळेची पटसंख्या वाढविली. एका छोट्याशा खोलीत भरणाऱ्या शाळेसाठी लोकवर्गणीतून इमारत देखील उभारली. या शिक्षकांमुळे या तांड्यावरील विद्यार्थांनाशिक्षणाची ओढ लागली. पालकांमध्येदेखील साक्षरतेबाबत जागृकता निर्माण झाली. 

 प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांची परीक्षा

प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांची परीक्षा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर घसरल्यामुळे तो उंचावण्यासाठी विभागीय आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. जुलैच्या दुस-या आठवड्यानंतर ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. साधारण साठ हजार शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऐच्छिक असून शिक्षकांनी न घाबरता आपण केवळ अपडेट आहोत की नाही यासाठी ही परीक्षा द्यावी असं सांगण्यात आलं आहे. 

बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरु 

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आता 18 जूनपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलैपासून सुरु होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 5 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.