Sujay Vikhe-Patil and Gaurav More Dance : नुकताच शिर्डीत (Shirdi) महापशुधन एक्स्पोच्या निमित्तानं शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेकांनी हजेरी लावली होती. त्यात नेत्यांपासून गायक सुदेश भोसले (Sudesh Bhosale) आणि अभिनेता आणि हास्यजत्रा फेम गौरव मोरे (Gaurav More) देखील स्टेजवर उपस्थित होता. दरम्यान, यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) यांनी गौरव मोरेसोबत जबरदस्त डान्स केला आहे. सुजय विखे पाटील आणि गौरव मोरेनं सुदेश भोसले यांनी गायलेल्या काही गाण्यावर डान्स केला आहे.
या कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुजय विखे आणि गौरव मोरे हे सुदेश भोसले यांच्यासोबत 'वन-टू- का फोर' आणि 'मैं हूँ डॉन' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. जेव्हा सुजय विखे हे डान्स करू लागले तेव्हा उपस्थितांमध्ये वेगळाच जल्लोष आला आणि ते सर्व आनंदानं डान्स करू लागले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना सुजय विखे यांच्या डान्सला दाद दिली आहे.
दरम्यान, गौरव मोरेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौरव मोरे सुदेश भोसले यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत शिर्डी महोत्सव 2023…, ज्यांना बघुन आपण मोठे झालो. आपल जेवढ वय आहे तेवढ़ा अनुभव असलेले सुधेश सर त्यांच्यासोबत मंच शेयर करायला मिळण हे मी माझ भाग्यच समजतो. सर तुमच्यावर खूप खूप प्रेम. कालच्या रात्री तुम्ही आमच्यासाठी जे पर्फॉर्म केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी कधीच विसरू शकणार नाही.
Sujay Vikhe Patil Dance | सुजय विखे पाटील यांचा वन..टू..का..फोर डान्स; सोशल मीडियावर तुफान व्हायरल
.
.
.#Sujayvikhepatil @drsujayvikhe #viralvideo #Dance pic.twitter.com/aiPkyb0ChQ— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 28, 2023
हेही वाचा : Alia Bhatt and Ranbir Kapoor Troll : सातासमुद्रापार लेकीला सोडून आलिया करतेय मज्जा?
गौरव मोरे आपल्यासगळ्यांचे महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून मनोरंजन करताना दिसतो. गौरवसोबतच समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या शोनं लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे खूप मनोरंजन केले. आजही प्रेक्षकांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. हास्यजत्रेचं सुत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते. तर अभिनेता प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हे परिक्षक आहेत.