Ajit Pawar : नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, अजित पवार यांनी सरकारला सुनावले

Ajit Pawar On Maharashtra Government : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सरकारमधील लोकांना वाईट वाटतं. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

Updated: Mar 30, 2023, 02:03 PM IST
Ajit Pawar : नपुंसक म्हणणे हा महाराष्ट्राचा अपमान नाही का?, अजित पवार यांनी सरकारला सुनावले title=

Ajit Pawar On Maharashtra Government : शिंदे - फडणवीस सरकारच्या कारभारावर सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढले आहे. त्यामुळे या सरकारवर मोठी नामुष्की ओढवली आहे. सुप्रीम कोर्टाचे ताशेरे ओढताना सरकारचा कारभार नपुंसक असल्याचे म्हटले आहे. आता हा महाराष्ट्राचा अवमान झाला नाही का?, सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हटल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. नपुंसक म्हणणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? आम्ही बोललो तर सरकारमधील लोकांना वाईट वाटतं. सुप्रीम कोर्टाने असं म्हणणं ही शिंदे सरकारची नामुष्की असून, सरकारला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यावेळी शेतकरी प्रश्नावर सरकारला सवाल केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्यानेअजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. बंद झालेली कांदा खरेदी केंद्र सुरु करुन कांदा उत्पादकांना सरकारने मदत करावी. अजूनही नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवून मदत करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली.

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही शिंदे सरकारला जाब विचारला आहे. महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटले आहे. गेले काही महिने या सरकारबद्दलच जनताच बोलत आहे. नपुंसक, बिनकामाचे म्हटले आहे. आणि आम्ही तर नाही म्हटले हे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. सरकार जसे सरकारमध्ये आले. त्यावरुन हे बोलले जात आहे. आजवर सर्वोच्च न्यायालय असे कोणत्याच राज्याबद्दल बोलले नाही. पण महाराष्ट्र सरकारबद्दल बोलते आहे. जे आम्ही म्हणतो की सरकार अस्तित्वात नाही, असे संजय राऊत म्हणाले.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x