Suresh Jain : माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडल्याने तातडीने मुंबईत हलवले

Suresh Jain News: शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन (Suresh Jain ) यांची प्रकृती बिघडल्यानं एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईत हलवण्यात आलं आहे.   

Updated: Dec 24, 2022, 10:37 AM IST
Suresh Jain : माजी आमदार सुरेश जैन यांची प्रकृती बिघडल्याने तातडीने मुंबईत हलवले title=

Suresh Jain News: शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन (Suresh Jain ) यांची प्रकृती बिघडल्यानं एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांना मुंबईत हलवण्यात आलं आहे.  (Suresh Jain Hospitalized) श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यानं त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. जैन यांना न्यूमोनियाची लागण झाल्याचं लक्षात आल्यावर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत हलवण्यात आलं आहे. 

घरकुल घोटाळ्यामध्ये गुन्हा दाखल होऊन सुरेश जैन यांना अटक झाली होती. 29 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी जैन यांच्यासह 47 जण दोषी ठरले होते. पण दोन आठवड्यांआधीच जैन यांना नियमित जामीन मंजूर झाल्यानं ते जळगावात परतले होते.

सुरेश जैन यांना काल मध्यरात्रीच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्युमोनियाची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्यानंतर तयांना अधिक उपचारांसाठी  हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. त्यांच्यावर आता  ब्रीच कँडी रुग्णालयात  उपचार सुरु करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरेश जैन हे तुरुंगात होते. नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच सुरेश जैन जळगावात दाखल झाले होते. घरकुल घोटाळा प्रकरणात सुरेश जैन यांना उच्च न्यायालयाने  नियमित जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते प्रथमच जळगावमध्ये दाखल झाले होते.  
 
जळगावमधील गाजलेल्या घरकुल प्रकरणी सुरेश जैन यांच्यासह इतरांना धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा आणि दंड ठोठावला होता. सुरेश जैन यांना सात वर्ष तुरुंगाची शिक्षा झाली आहे. सुरेश जैन हे पाच वर्ष कारागृहात होते. याच दरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना यापूर्वी साल 2019 मध्ये वैद्यकीय जामीन मंजूर झाला होता. मात्र जळगाव जिल्ह्यात येण्यास त्यांना बंदी घालण्यात आली होती. परंतु हाच जामीन नियमित झाल्यामुळे देशभरात सुरेश जैन यांना कुठेही फिरता येणार आहे. त्यानंतर ते जळगावात दाखल झाले होते.