close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

इस्लामपूर - सांगली रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दरम्यान ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकल्याचा प्रकार घडला आहे. 

Updated: Sep 16, 2019, 04:28 PM IST
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या

सांगली : इस्लामपूर - सांगली रस्त्यावर मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दरम्यान ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकल्याचा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री यांचा ताफा येताच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कडकनाथ कोंबड्या फेकल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करणाऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कुंडल फाटा येथे पोहोचली असता हा प्रकार घडला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी ताफ्यासमोर येत आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकार्ते आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील पाहायला मिळाली. स्वाभिमानी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी हे आंदोलक करत होते. हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असून या प्रकरणी पश्चिम महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मोठा बंदोबस्त असताना ही आंदोलकांनी हे आंदोलन केलं.