close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक, छगन भुजबळ अनुपस्थित

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळ्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.

Updated: Sep 16, 2019, 01:56 PM IST
नाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक, छगन भुजबळ अनुपस्थित

नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळ्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. नाशिक महामार्गालगत राष्ट्रवादीच्या कार्यालयात या बैठका सुरू आहेत. पण या बैठकीला नाशिकचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अनुपस्थित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा छगन भुजबळांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण  छगन भुजबळ हे आघाडीच्या बैठकीसाठी आज मुंबईत आहेत, असं सांगून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजू सावरली.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यादेखील नाशिक दौऱ्यावर होत्या. त्यावेळीही तब्येत बरी नसल्याचं सांगून छगन भुजबळ गैरहजर राहिले. तसंच छगन भुजबळ यांनी आपला फोन उचलला नसल्याचंही तेव्हा सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं. सुप्रिया सुळेंच्या नाशिक दौऱ्यावेळी नांदगावमध्ये राष्ट्रवादीच्या पोस्टरवरून छगन भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ गायब दिसले.

गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं आहे.