जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टँकरनं घेतला पेट

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलची गळती होऊन टँकरनं पेट घेतल्यानं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल आणि रसायनीदरम्यान भोकरपड़ा गावाजवळ ही घटना घडली. 

Updated: Aug 6, 2017, 10:58 AM IST
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर टँकरनं घेतला पेट title=

पनवेल : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पेट्रोलची गळती होऊन टँकरनं पेट घेतल्यानं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल आणि रसायनीदरम्यान भोकरपड़ा गावाजवळ ही घटना घडली. 

खोपोलीकड़े निघालेल्या या टँकरला अपघात झाला. त्यानंतर टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली आणि या पेट्रोलनं पेट घेतला. 

ही आग इतकी भीषण होतो की धुरांचे लोट रस्त्यापर्यंत येत होते. त्यामुळे पनवेल आणि खोपोलीकडे जाणारी वाहतूक बंद करावी लागल्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली.