भीक मागणारी अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

गेल्या पाच महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू असून ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तवही उघड झाले आहे. 

Updated: Nov 19, 2017, 08:38 PM IST
 भीक मागणारी अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती title=

बीड : बीडमध्ये भीक मागणारी अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर झालेल्या चौकशीत या मुलीवर सतत अत्याचार होत असल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

पाच महिन्यापासून अत्याचार

गेल्या पाच महिन्यापासून तिच्यावर अत्याचार सुरू असून ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे धक्कादायक वास्तवही उघड झाले आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जावेद शेख असे त्याचे नाव आहे. 

जगण्यासाठी भीक

उदरनिर्वाहासाठी पीडित मुलगी भीक मागत असे. त्यामुळे तिच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन नराधमाने डाव साधल्याचे उघड झाले आहे. .या पीडितेची आई अंध आहे.

कोण आहे जावेद ?

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा जावेद शेखचे स्वत:चे मोबाईल दुकान आहे. नराधम जावेद हा सातत्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत असे. यातूनच पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे.

पोलिसांची कारवाई 

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तपास सुरु केला. पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.