आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान ठाणे पोलिसांच्या जाळ्यात

 ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या बुकींच्या लॅपटॉप मध्ये सदरची वेबसाईड आढळल्या नंतर पोलिसांनी तपास करून सोनूला अटक केली आहे

Updated: May 30, 2018, 09:08 AM IST
आंतरराष्ट्रीय बुकी सोनू जालान ठाणे पोलिसांच्या जाळ्यात

ठाणे: गेले अनेक दिवसांपासून फरार असलेला अंतरराष्ट्रीय स्तरावरील बुकी सोनू जालान यास ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याण न्यालयालय परिसरातून अटक केली. कल्याण येथे त्याच्या साथीदाराला भेटण्यासाठी सोनू येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. नुकत्याच झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब या सामन्यासाठी त्याने सट्टा लावल्याचे समोर आलं आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने यापूर्वी ५ जणांना अटक केल्यानंतर आता सोनू हा सहावा आरोपी आहे.

सट्ट्यासाठी हायटेक प्रणालीचा वापर

 सट्टा लावण्यासाठी सोनूने बेट आणि टेक नावाची वेबसाईट बनविली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून हवालाच्या मार्गाने पैसे या ठिकाणी जमा करण्यात येत होते. त्यानंतर सट्टा लागत असल्याचे समोर आले आहे. सोनूला वेबसाईट बनवून देणारा एकांश शहाचा देखील पोलीस शोध घेत आहे.

ऑनलाईन चिकू नावानेही सट्टा

ऑनलाईन चिकू नावाने देखील सोनू सट्टा चालवत होता. यापूर्वी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलेल्या बुकींच्या लॅपटॉप मध्ये सदरची वेबसाईड आढळल्या नंतर पोलिसांनी तपास करून सोनूला अटक केली आहे.