पुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी मुंबई - ठाण्यातून दोघांना अटक

एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईतून व्हर्नन गोन्साल्वीस आणि ठाण्यातून अरुण परेराला अटक करण्यात आलीय.

Updated: Aug 28, 2018, 05:20 PM IST
पुण्यातील एल्गार परिषदेप्रकरणी मुंबई - ठाण्यातून दोघांना अटक  title=

ठाणे : पुण्यातल्या एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईतून व्हर्नन गोन्साल्वीस आणि ठाण्यातून अरुण परेराला अटक करण्यात आलीय. सकाळपासून या दोघांच्या घरांवर छापे घालण्यात आले होते आणि शोधमोहीम सुरु होती. अखेर प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी या दोघांना अटक करण्यात आली. 

ठाण्यातल्या चरई भागातून शेरॉन इमारतीच्या ४०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अरुण राहत होता. मानवी हक्कांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप परेरानं केलाय. तर कोरेगाव भीमाच्या घटनेशी संबंध नसल्याचा दावा गोन्साल्वीसनं केलाय. तसंच संभाजी भीडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप गोन्साल्वीसनं केलाय.