ठाणे: ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सख्ख्या भावंडांचा मृत्यू

काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे

Updated: Jun 4, 2018, 09:41 AM IST

ठाणे: महापालिकेतील ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे कळव्यात दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झालाय. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने मलनिस्सारण वाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात हे दोघे पडले आणि त्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नंदिनी गुप्ता आणि आनंद गुप्ता अशी या दोन भावंडांची नावं आहेत. ठाणे महापालिकेनं या कामाचा ठेका एका कंपनीला दिला होता. मात्र काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या प्रकरणी चौकशी सुरु असून हलगर्जीपणा झाल्याचं स्पष्ट झाल्यास ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं कळवा पोलिसांनी सांगीतलंय.