रायगडला पावसासोबत वादळाचा तडाखा

आदिवासी वाडी सह अन्य भागातील लोकवस्तीला देखील मोठा फटका बसला आहे गावातील वीजेचे लोखंडी पोल देखील पडले असल्याने गावाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

Updated: Jun 4, 2018, 09:42 AM IST

रायगड: मागील दोन दिवसांपासून रायगडमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे पावसासोबतच काही भागात वादळाचा तडाखा बसला आहे दक्षिण रायगड मधील महाड पोलादपूर तालुक्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसाने आल्हाददायक वातावरण निर्माण केले असले तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाड तालुक्यातील वाकी या गावात वादळाचा जोरदार तडाखा बसल्याने शेकडो घरांचे व गुरांच्या गोठयांचे  मोठे नुकसान झाले आहे. अनेक मोठ मोठे वृक्ष उन्मळून थेट घरांवर कोसळल्याने सुमारे ३० ते ४०  घरे तसेच गावातील ग्रामपंचायतीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. आदिवासी वाडी सह अन्य भागातील लोकवस्तीला देखील मोठा फटका बसला आहे गावातील वीजेचे लोखंडी पोल देखील पडले असल्याने गावाचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.