ती चर्चा अखेर 'एप्रिल फूल' ठरली, गृहमंत्रीपदावरुन आघाडीत सर्व काही आलबेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज आहेत. या बातम्या येऊन धडकताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट वर्षावर धाव घेतली.

Updated: Apr 1, 2022, 04:47 PM IST
ती चर्चा अखेर 'एप्रिल फूल' ठरली, गृहमंत्रीपदावरुन आघाडीत सर्व काही आलबेल title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज आहेत. या बातम्या येऊन धडकताच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट वर्षावर धाव घेतली. तासाभराच्या चर्चेनंतर गृहमंत्री वर्षा बंगल्यावरून निघाले आणि...

भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून राज्यातील नेत्यावर कारवाई करत आहे. मात्र, पुरावे देऊनही भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यानं मुख्यमंत्री नाराज असल्याच्या बातम्या गेले काही दिवस चर्चेत होत्या.

विधानसभेत विरोधाने उपस्थित केलेल्या  कायदा आणि सुव्यवस्थावरील चर्चेला उत्तर देताना गुरहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री आमच्या कामावर खुश आहेत. ते सातत्याने चौकशी करत असतात, असे सांगितले होते.

त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांच्या कामावर नाराज असल्याची चर्चा होती. काल, मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पुन्हा या चर्चेने जोर धरला. राज्यातील गृह विभागाच्या कारभारावरून वळसे यांच्यावर काँग्रेस आणि सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची बातमी आली.

पुरावे देऊनही गृहमंत्री वळसे पाटील यांना कारवाई करता येत नसेल तर गृहखातं शिवसेनेकडे सोपवण्यात यावं अशी मागणी शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याची चर्चा सुरु झाली. तशा बातम्याही येऊन धडकल्या. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

ही बैठक संपवून गृहमंत्री मंत्रालयात येत नाहीत तोच मुख्यमंत्री कार्यालयाकडून या बातम्यांचे, चर्चांचे खंडन करण्यात आले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. ते उत्तम काम करत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

तर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री यांच्याशी आमची रुटीन चर्चा होत असते. काही गोष्ठीसन्दर्भात त्यांच्याशी वेळोवेळी मिटिंग होत असते. चार दिवसांपूर्वीच एक प्रशासकीय मिटिंग ठरली होती. त्या मिटिंगसाठी वर्षा बंगल्यावर गेलो होतो असे सांगितले. त्यामुळे या सगळ्या चर्चा आणि बातम्या केवळ एप्रिल फुल ठरल्या आहेत.