संतापजनक घटना, चड्डीत लघुशंका केल्याने चिमुकल्याला बापाने दिले चटके

कल्याणमधील एक संतापजनक घटना समोर आली आहे.  

Updated: Dec 5, 2020, 08:49 PM IST
संतापजनक घटना, चड्डीत लघुशंका केल्याने चिमुकल्याला बापाने दिले चटके

कल्याण : एक संतापजनक घटना समोर आली आहे. चड्डीत लघुशंका केल्याने सात वर्षांच्या चिमुकल्याला जन्मदात्या बापाने चटके (child clicks )दिले. कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये लहानग्यावर उपचार सुरु आहेत. तर निर्दयी बापाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन कांबळे असं निर्दयी बापाचं नाव आहे. 

चिमुकल्याने  चड्डीतच लघुशंका केल्याने निर्दयी बापाने गरम उलथण्याने चटके (father gave the child clicks) दिल्याची अंगावर शहरे आणणारी घटना कल्याण पूर्वेत घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील सचिन कांबळे  याने आतापर्यत तीन लग्न केली आहेत. दुसऱ्या पत्नीचा हा चिमुकला सचिन आणि त्याची तिसरी पत्नी आणि तिच्या दोन मुलीसमवेत राहतो. काल रात्री या चिमुकल्याने चड्डीतच लघुशंका केली. यामुळे चिडलेल्या निदर्यी बापाने या चिमुरड्याला तापलेल्या उलथन्याने चटके देत जखमी केले. 

ही बाबत या चिमुकल्याच्या नातेवाईकाना कळताच त्यांनी त्याला कल्याणच्या सरकारी रुग्णालयात  उपचारासाठी नेले. याप्रकरणी नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सचिन कांबळे  याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी सचिन कांबळे याला ताब्यात घेत गुन्हा केला आहे.