खुशखबर... आता 'हे' लोकेशन दिसणार गुगल मॅपवर

पुण्यामध्ये पीएमपीएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास बातमी आहे.

Updated: Nov 2, 2022, 02:16 PM IST
खुशखबर... आता 'हे' लोकेशन दिसणार गुगल मॅपवर title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: हल्ली गुगलमुळे (google apps) आपल्या सर्व सोयी सुविधा अगदी सुखकर झाल्या आहेत आपल्याला हवं तेव्हा हव्या त्या गोष्टी करता येतात, वापरता येतात. किंबहूना काही सेकंदातच आपलं संपुर्ण काम आपल्याला (how do download google apps) सहजरीत्या करताही येतं. आपल्या आयुष्यात गुगल मॅपचा वापर अविभाज्य राहिला आहे. फक्त गुगलच नाही तर गुगलमधल्या अनेक फिचरचा (Google features) आपल्याला चांगलाच फायदा करून घेता येऊ शकतो. आपल्याला महितीच आहे की गुगल लोकेशन मुळे आपण त्यावर कितीतरी आधारलेलो आहोत. आपल्यालाही लोकेशन समजून घेतल्यानं सगळाच फायदा होतो आहे. वेळेवर पोहचता येतं, तसेच वेळेवर घरून निघताही येतं. लाईव्ह लोकेशनमुळे आपल्याला हा फायदा होतो आहे. (the location of pmp bus will now be visible on google maps)

पुण्यामध्ये पीएमपीएलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खास बातमी आहे. लवकरच तुम्हाला पीएमपीएल बसच लाईव्ह लोकेशन गुगल मॅप द्वारे मिळणार आहे. यासंदर्भात पीएमपीएल आणि गुगल मध्ये करार झाला आहे.

हेही वाचा - Eknath Shinde: शिंदे सरकार राणेंवर मेहरबान! कणकवलीला दिलं भरभरून...

या सुविधेचा फायदा (Google news) तुम्हालाही करता येईल. कारण यामुळे तुमच्या बसच्या प्रवासात तुम्हाला चांगलीच पारदर्शकता (Bus) मिळेल. सध्या अशा या सुविधांमुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्हाला या लोकेशनवरून तुम्हाला ऑफिसमुळे बाहेर पडल्यानंतर येणाऱ्या बसेसची चांगलीच माहिती मिळू शकते म्हणजे तुम्ही लवकरच घरी जाऊ शकता.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

प्रवाश्यांना ज्या मार्गावर प्रवास करायचा आहे तो मार्ग गुगल वर टाकल्यानंतर त्या मार्गावर धावणाऱ्या बसेस बस स्टॉप तसेच बस किती वेळात (Bus stop stations near me) स्टॉपवर पोहोचणार अशी सगळी माहिती मोबाईल (Moblie) वरील गुगल मॅप (google map) वर मिळणार आहे.