आगीनंतर बेपत्ता मायलेकांचा मृतदेह विहिरीत, अग्नीकांडाचे गूढ वाढले

 आगीनंतर बेपत्ता झालेल्या मायलेकांचा मृतदेह गावातील विहिरीत.

Updated: Jul 6, 2019, 10:31 AM IST
आगीनंतर बेपत्ता मायलेकांचा मृतदेह विहिरीत, अग्नीकांडाचे गूढ वाढले title=

रायगड : खालापूरच्या बीड खुर्द येथील आगीनंतर बेपत्ता झालेल्या मायलेकांचा मृतदेह गावातील विहिरीत सापडल्याने या अग्नीकांडाचे गूढ अधिक वाढले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे या घटनेचा गुंता आणखीनच वाढला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर बीड गावातील भानुदास कर्णुक यांच्या घराला आग लागली. यावेळी कर्णुक यांची मुलगी स्नेहा हिने घराच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला होता. मात्र, त्यांचे मृतदेह विहिरीत सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

खालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथे घराला लागलेल्या आगीनंतर बेपत्ता झालेल्या आई आणि मुलाचा मृतदेह त्याच गावातील विहिरीत आढळून आलेत. ज्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी उडी मारली. ते आत्महत्या करणार नाही, अशी चर्चा परिसरात करण्यात येत आहे. दरम्यान, स्नेहा हिची आई रंजना आणि भाऊ सनील हे दोघे घरातच होते. तर भानुदास कर्णुक हे पेट्रोल पंपावर नोकरीसाठी गेले होते. आग विझवल्यानंतर दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दोघेही सापडले नाहीत. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. 

या गूढमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र शुक्रवारी रंजना आणि सनील या दोघांचेही मृतदेह गावातील विहिरीत तरंगताना आढळले. त्यामुळे हे प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.