किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबतच आता इंटरनेट ही अत्यावश्यक बाब झाली आहे. इंटरनेट सबकुछ झालेलं असताना त्यावर आपण जी माहिती टाकतो ती माहिती देखील चोरण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. याला फ्री पब्लिक वेबसाईट्न हातभार लावला आहे. या संकेतस्थळांवरील ओपन ई-मेल सुविधेमुळे कुणाचीही माहिती चोरणं अगदी सोप्पं झालं आहे.
माहिती तंत्रज्ञान चोर या साईट्सचा वापर करून तुमच्या सोशल मीडिया अकाऊंट्सची माहिती मिळवतात. याच मेल आयडीचा वापर करून विवाहसंकेतस्थळांवरची माहिती आणि फोटोही चोरतात. प्रसंगी तुमचा आधार आणि पॅनकार्डची माहितीही पळवली जाते. त्यामुळे अशा वेबसाईट्स बंद करण्य़ाची मागणी नागरिकांमधून होऊ लागलीय.
सरकारचं या चोरीच्या पद्धतीकडं लक्ष गेलेलं नाही. पण अशा प्रकारे युजर्सची खासगी माहिती चोरुन गरज असेल त्यांना अगदी पाच ते पंधरा पैशांना विकली जाते. या माहितीच्या आधारेच काही चोर लुटारू ऑनलाईन गंडा घालतात त्यामुळे सावधान राहण्याची गरज आहे.