Navi Mumbai Water Issue : राज्यात सूर्याचा पारा वाढला आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. (Water Supply News ) यातच आज नवी मुंबई , पनवेल या दोन शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही तांत्रिक कामासाठी आज पाणी येणार नाही. तर उद्या गुरुवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे. (water cut in Navi mumbai)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची कामे आज 15 मार्चला करण्यात येणार आहेत. यामुळे बुधवारी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेसह कामोठे, खारघर परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारी 16 मार्चला कमी दाबाने पाणी येणार आहे. पाणी जपून वापरावे असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने आणि पनवेल पालिकेने केले आहे.
दरम्यान, गेल्यामहिन्यात नवी मुंबई पालिकेच्या मेनलाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीमुळे नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद (Water supplay) होता. महाराष्ट्राच्या शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) हेटवेन पाणीपुरवठा लाईनची देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. कामोठे नोडमध्ये पाणीपुरवठा (water cut) बंद ठेवण्यात आला होता. याचा फटका द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा नोड्स तसेच हेटवणे बसला होता. दुसऱ्या लाईनवरुन पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, पुरेसे पाणी न मिळाल्याने नागरिकांचे हाल झालेत.