Pregnant Man: पुरुष कधी गरोदर राहू शकतात का? असा प्रश्न कधी तुम्ही ऐकलाय का. पण नागपुरात अशी एक घटना घडलीये जी वाचून तुम्हीदेखील हैराण व्हाल. नागपूरात (Nagpur) 36 वर्षांच्या तरुणाचे पोट फुगलेले होते. लोक त्याला प्रेग्नेंट आहेस का म्हणून चिडवायचे देखील. या तरुणाने शेवटी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी ऑपरेशन करताच धक्कादायक प्रकार समोर आला. नागपूरात काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
नागपुरात राहणाऱ्या संजू भगत या तरुणासोबत ही अजब घटना घडली आहे. संजू लहानपणापासून एकदम ठणठणीत होता. फक्त त्याचे पोट इतर मुलांच्या तुलनेने मोठे होते. सुरुवातीला सगळ्यांना पोटाला सूज आली असेल म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, जसजसे त्याचे वय वाढत गेले तसा पोटाचा घेरही वाढत गेला. पोट वाढत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीय चिंतेत पडले. संजूचे पोट इतकं मोठं झालं होतं की लोक त्याला गरोदर पुरूष म्हणून चिडवू लागले होते.
संजू यांनी वाढलेल्या पोटाकडे आणि लोकांच्या चिडवण्याकडे दुर्लक्ष केले. ते कित्येक वर्ष वाढलेल्या पोटासह आपले आयुष्य व्यतित करत होते. मात्र 1999 साली त्यांचे पोट इतके वाढले की त्यांना श्वास घेण्यासदेखील त्रास होई लागला. त्रास असह्य झाल्याने अखेर त्यांनी डॉक्टरांकडे जायचा निर्णय घेतला.
संजू भगत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सुरुवातीला डॉक्टरांनी पोटात ट्युमर असू शकतो अशी शक्यता वर्तवली. मात्र, ऑपरेशनसाठी जसं डॉक्टर अजय मेहता यांनी शस्त्रक्रियेसाठी पोटाची तपासणी करताच आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. पोटात ट्युमरनसून भलतेच काही तरी निघाले.
In 1999, Sanju Bhagat's stomach was so swollen he looked nine months pregnant and could barely breathe.
Eventually his difficulty breathing got so bad that he was rushed into hospital.
Doctors suspected that his enlarged abdomen was a tumor. That was until they opened him up… pic.twitter.com/kEQpC8TCuT
— Morbid Knowledge (@Morbidful) June 7, 2023
एका वृत्तसंस्थेनुसार, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी संजू भगत यांचे पोट कापून आत हात टाकताच तिथे काही हाडं असल्याचं त्यांना जाणवलं. सुरुवातीला डॉक्टरांनी एक पाय बाहेर काढला, नंतर केस, हात, जबडा यासारखे शरिरातील बाकीचे अवयवदेखील बाहेर आले. या घटनेने डॉक्टरदेखील चकित झाले होते.
डॉक्टरांनी या घटनेला वॅनिशिंग ट्विन सिंड्रोम म्हटलं आहे. म्हणजेच, गर्भावस्थेत असतानाच जुळ्या मुलांचा मृत्यू झाला मात्र त्यांचे अवशेष पोटात तसेच राहिले. काही तज्ज्ञांच्या मते, संजू भगत त्यांच्या आईच्या गर्भात असतानाच त्यांच्या पोटात जुळी मुली असतील. हा एक दुर्लभ आजार असून जगभरात 50 लाख लोकांपैकी एकासोबत असा प्रकार घडतो.