दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी घट, 15 हजार 77 नव्या रुग्णांचं निदान

 राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Updated: May 31, 2021, 09:29 PM IST
दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी घट, 15 हजार 77 नव्या रुग्णांचं निदान title=

मुंबई : कोरोनाच्या पॉझिटिव्ह वातावरणात राज्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे दुर्देवाने 184 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 53 लाख 95 हजार 370 रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहे. राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांचा आकडा हा 2 लाख 53 हजार 367 इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 93.88 इतका झाला आहे. (today 31 may 2021 15077 patients have been tested corona positive in maharashtra state)

मुंबईतील रुग्णसंख्येत घट

राजधानी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत होते. पण सातत्याने काही आठवड्यापांसून मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासाच मुंबईत कोरोनाचे 676 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 5 हजार 570 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 29 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 22 हजार 390 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मुंबईतील कोरोना दुप्प्टीचा दर हा आता 433 दिवसांवर पोहचला आहे.  

 

1 जूनपासून मुंबईतील निर्बंध शिथील

मुंबईत गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने रुग्णसंख्येत कमालीची घट होतोना दिसतेय. या पार्श्वभूमीवर 1 जूनपासून मुंबईत काही निर्बंध हे शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक आणि इतर दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तर इतर दुकानं शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकानं ही सम-विषम पद्धतीने सुरु ठेवता येणार आहेत. 

संबंधित बातम्या : 

मुंबईत उद्यापासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होणार