प्रशांत शर्मा, प्रतिनिधी, झी मीडिया, भंडारदरा : ख्रिसमसची सलग सुट्टी साधत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा आणि हरिश्चंद्र कळसूबाई परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेत. बॅकवॉटरभोवती बोच-या थंडीत कॅम्पिंगचा आनंद पर्यटक घेतायत.
धरणाच्या बॅकवॉटरभोवती सुमारे दोनशेहून अधिक तंबू पडलेत. भंडारदरा हे पर्यटनस्थळ नाशिक, मुंबई आणि पुण्याजवळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येतेय. राज्याच्या विविध भागासह गुजरातमधूनही पर्यटक इथं दाखल होतात.
भंडारदरा धरणाच्या जलाशयातून स्थानिक आदिवासी युवकांकडून बोटिंगची सुविधा देण्यात येते. तसंच भंडारदरा गाईड समूहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पर्यटकांना करण्यात येतंय.
लाँग विकेंड, नाताळसाठी भंडारद-यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार आणि कमाईचं साधनही उपलब्ध झालंय. आता एमटीडीसी आणि स्थानिक हॉटेल्स नववर्षाच्या स्वागतासाठी आधीच बुक झालेत.