ट्रकची बाईकला जोरदार धडक; तीन वर्षांच्या चिमुरडीसहीत आईचा मृत्यू

दिलीप विश्वकर्मा पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसह बाईकवर भाईंदरवरून ठाण्यात जात होते

Updated: Oct 11, 2019, 08:19 AM IST
ट्रकची बाईकला जोरदार धडक; तीन वर्षांच्या चिमुरडीसहीत आईचा मृत्यू  title=

ठाणे : ठाण्यातील भरधाव ट्रकनं मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मायलेकीचा मृत्यू झालाय. दिलीप विश्वकर्मा पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीसह बाईकवर भाईंदरवरून ठाण्यात जात होते. त्यावेळी घोडबंदर रोडजवळ भरधाव ट्रकनं त्यांच्या बाईकला धडक दिली. त्यात त्यांची पत्नी लीलावती विश्वकर्मा आणि मुलगी प्रांजलचा दुर्देवी मृत्यू झालाय. दिलीप विश्वकर्मा जखमी झालेत. कासारवडवली पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलंय. 


भीषण अपघात

हा अपघात किती भयंकर होता, हे फोटोंवरून लक्षात येऊ शकेल.

दिलीप विश्वकर्मा हे ठाण्यातील ब्रम्हांड भागात राहतात. पत्नी आणि मुलीसोबत काही कामानिमित्त ते भाईंदरला गेले होते. परंतु, घरी परतत असताना घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा या ठिकाणी समोरून आलेल्या भरधाव ट्रकनं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.